राजमुद्रा : राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” गेम चेंजर ठरली.. या योजनेचे जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या बँकेत जमा ही झाले.. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे..डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच मिळणार आहे. तर जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकरसंक्रातीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलै पासूनचे ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र आता डिसेंबरचा हपता सरकार कधी जमा करणार? खात्यामध्ये पैसे किती जमा होणार? 1500 की 2100 याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात दिली आहेत.आम्ही जी आश्वासनं दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सभागृहात म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या काही दिवसांपासून या योजनेत बदल तसेच निकष बदल असल्याचे वारंवार सांगण्यात येते.. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या निकषात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती सांगितली आहे.. तसेच सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.. त्यामुळे मकर संक्रांति आधीच लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे..