राजमुद्रा : गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये बीड आणि परभणी प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या महायुती सरकारच्या स्थापनेनंतरच पहिलं हिवाळी अधिवेशन आज संपणार आहे.. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत परभणी आणि बीड संदर्भात उत्तर देताना जोरदार टोला विरोधकांना लगावला.परभणी आणि बीडमध्ये जे झाले त्याबाबत न्याय मिळणार आहे. कारण आमचे हे सरकार न्यायाचे सरकार आहे. आम्ही कामातून उत्तर देऊ असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
परभणी आणि बीड या ठिकाणी घडलेल्या घटनांची चौकशी सुरु केली आहे. दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आणि महाविकास आघाडीला पराभवाला समोर जावं लागलं.. या महायुतीच्या सरकारने अडीच वर्षांत विक्रमी कामे केली. सर्व बंद पडलेल्या योजना सुरु केल्या. जे लोक योजना बंद करत होते, त्या लोकांना जनतेने घरी बसले. विधानसभा निवडणुकीत जनतेने काम करणाऱ्यांना निवडून दिले. आम्ही आमच्यावर केलेल्या आरोपांना कामातून उत्तर देऊ असा टोला त्यांनी लगावला..
महायुती सरकारच्या काळात विविध विकास कामे झाली.. सद्यस्थितीला लोकांना आरोप नको आहे, विकास कामे हवी आहे. ती आम्ही दिल्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले. त्यामुळे पुन्हा राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले. दरम्यान मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी जोरदार टीका आरोप केले मात्र आता महायुतीने आणलेली कोणतीही योजना बंद होणार नाही. नव्या योजनाही आणू, असे त्यांनी यावेळी सांगितले.