राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला.. त्यांनी आतापर्यंत सलग सहावेळी विजय मिळवला असून आता सातव्यांदा ही त्यांनी बाजी मारली आहे.. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना मंत्रीपद देण्यात आल असून गिरीश महाजन यांच्याकडे आता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन खात देण्यात आल आहे..
जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपाकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे रिंगणात होते. या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी भरघोस मत मिळवून दणदणीत विजय मिळवला.. दरम्यान फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आता नवी संधी त्यांना देण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अखेर शेवटच्या दिवशी मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झालं.
या खातेवाटपामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण व संसदीय कामकाज देण्यात आले आहे. गिरीश महाजन यांच्याकडे लसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ) तर नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभाग देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंडे भावंडांकडे देखील महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खाते तर पंकजा मुंडे यांना र्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन ही खाती देण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळांमध्ये भाजप नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.