राजमुद्रा : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला..आता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्याकडे पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील महत्वाची लढत म्हणून बघितल्या जाणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षविरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी लढत झाली.. या लढतीत जनतेने पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटील यांना कौल दिला.. सलग तिसऱ्यांदा आणि आमदार म्हणून पाचव्यांदा निवडून आलेले गुलाबराव पाटील यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पाणीपुरवठा खाते सोपवण्यात आले.
गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.विधानसभा निवडणुकीच्या एरंडोल मतदारसंघातून 1999 मधून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.त्यानंतर 2004 मध्ये एरंडोल मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडून आले.त्यानंतर या मतदारसंघाची पुनरच्या झाल्यानंतर त्यांनी जळगाव ग्रामीण मधून 2009 मध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी त्यांना पराभव केले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून येऊन तिसऱ्यांदा आमदार झाले.. त्याच कार्यकाळ त्यांना राज्यमंत्री करण्यात येऊन सहकार खाते मिळालं होतं त्यांनी पहिल्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्ये ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आणि पाणीपुरवठा खाता देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आलं.त्यानंतर आता 2024 च्या निवडणुकीत विजय मिळवला.. पुन्हा एकदा त्यांना पाणीपुरवठा खातं सोपवण्यात आलं.