राजमुद्रा :आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर आता आगामी होणाऱ्या या निवडणुकांसाठी 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठका विधानसभा निहाय होणार आहेत. या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बैठकांचा धडाका लावणार आहेत.
या बैठकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवर देण्यात आले आहेत. तसेच यासाठी विधानसभानिहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी चर्चा केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 डिसेंबरच्या बैठकीत सादर केला होता. त्यानंतर आता या निवडणुकीसाठी हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
मुंबई महापालिकेचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार कंबर कसली असून या निवडणुकीसाठी बैठकांचा धडाका लावला आहे.. दरम्यान या आधीच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला राज्यात 20 जागांवर विजय मिळाला. त्यातील 10 जागा या मुंबईतील आहेत. त्यामुळे पुन्हा मुंबईकडे त्यांनी लक्ष लावले आहे.
मातोश्रीवर 4 दिवस बैठका होणार आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर आगामी मुंबई महानगर पालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढवावी असं पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे. यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी की स्वबळावर लढणार, याकडे आता शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
>> पदाधिकारी आढावा बैठक
> 26 डिसेंबर – बोरिवली विधानसभा , दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा
> 27 डिसेंबर -अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा
> 28 डिसेंबर -मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द – शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा