राजमुद्रा : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने संपूर्ण देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.. मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाला आता हिंसक वळण लागला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा व अमित शाह यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले. दरम्यान दुसरीकडे चंदीगड महापालिकेत ही काँग्रेस भाजप आणि आम आदमी पक्षाचे नगरसेवक भिडले.. काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून लातूरमध्ये माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटार सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नांदेडमध्ये शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभाताई धानोकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात माजी आमदर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती मधील मोर्चात जिल्हाध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसने अमित शाह व भाजपाविरोधात सुरु केलेले आंदोलन यापुढेही सुरुच राहणार आहे. जालनामध्ये शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व मा. आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिले आहे..