राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यमंत्री मंडळाच्या विस्तार नंतर खाते वाटप जाहीर झाले.. यानंतर आता सरकारमधील मंत्री ॲक्शन मोडवर आले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आता महायुती सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर त्यांनी माजी दिंवगत मंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहंराजे भोसले यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी शरद पवारांच्यावर बोलताना खळबळजनक आरोप करत म्हणाले, अभयसिंहराजे भोसले हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापेक्षा एक टर्मने सीनियर होते. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले संयमी नेतृत्व होते. मात्र शरद पवारांनी यांनी त्यांना बाजूला ठेवलं. त्यामुळे त्यांचा नुकसान होऊन जिल्ह्याचे नुकसान झालं असा दावा देखील त्यांनी केला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले होते. शरद पवारांनी त्यांना डावल्यामुळे त्यांचा मोठे नुकसान झालं आहे.. त्यांना जर मंत्रीपद दिला असता तर सातारा जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असते..साताऱ्यातील माण खटाव या भागाला उरमोडी धरणातुन पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यावेळी संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान झाले”, असा दावा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव सामोरे जावे लागले.. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षालाही कमी जागावर समाधान मानावं लागलं..