राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचं खातेवाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री पदावरून राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केलं आहे.. या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवू असं त्यांनी म्हटले आहे.. तसेच इथे कोणाचेही दादागिरी आम्ही चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात पालकमंत्री पदी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेकांना संधी मिळाली तर अनेकांना डच्चू देण्यात आला.. त्यानंतर आता महायुतीमध्ये अनेक जागांवर पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. बीड जिल्ह्याकडे सर्वांच्या नजरा लागला असताना याबाबत आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. गेल्या वेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यावेळीही त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.यातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं अश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. दरम्यान त्यानंतर आता बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.