राजमुद्रा : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाला पराभवाला समोर जावं लागलं..यानंतर आता मालेगावात ही ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे..मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांचे बाजार समितीतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मालेगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती असून सुद्धा बाजार समितीच्या कार्यकाळात जास्तीत जास्त अनुपस्थित असल्याने तक्रारदाराने केलेले तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी अद्वय हिरे यांच्याविरोधात निकाल दिला आहे. अद्वय हिरे बाजार समितीचे सभासदत्व रद्द होणे म्हणजे हा त्यांच्यासाठी मोठा धक्काच मानला जातो आहे..
तक्रारदाराने तक्रार केलेल्याची दखल घेऊन कोकणी बंद करा आणि निकालात असे म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे हे बाजार समितीच्या दिनांक २८/११/२०२३, २७/०१/२०२४, २६/०३/२०२४, २५/०५/२०२४, १८/०७/२०२४ आणि २६/०८/२०२४ अशा एकूण ७ मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याचे सिध्द होत आहे. सदर बाबत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमयन) अधिनियम, १९६३ मधील कलम २४ ची तरतूद प्रभावित होते, असं स्पष्ट सांगितलं. त्यामुळे त्यांचं पद रद्द झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे…