जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात एका ३२ वर्षीय तरुणाला गंभीर अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले. या वेळी रुग्णाला चालणेही शक्य नव्हते. त्याच्या शरीरात एक ग्रॅम रक्त शिल्लक राहिले होते. अशा अवस्थेत संबंधित रुग्णाला तात्काळ मेडिसिन वार्डात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे त्या युवकाला नवीन जीवनदान मिळाले आहे. संबंधित रुग्णाला मेडिसिन वॉर्डात दाखल केल्यानंतर त्याच रात्री रक्ताच्या बाटल्या आणि सलाईन द्वारे औषधी देत उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांना ईश्वराची साथ लाभली आणि तरुणाचे प्राण वाचले.
प्राप्त माहितीनुसार जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी भूषण बोडके हे गेल्या सहा महिन्यापासून कौटुंबिक कारणामुळे नैराश्याच्या भोवऱ्यात अडकले होते. परिणामी दारूचे व्यसनही त्यांना जडले. तसेच जेवणाची सुद्धा शुद्ध राहिली नाही. या प्रकारामुळे भूषणला मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आला. त्याला चालणे अशक्य होऊन शरीराची हालचाल बंद झाली. आवाजही निघत नव्हता. अशा परिस्थितीत कुटुंबीय भूषण ला घेऊन १७ जून रोजी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात घेऊन आले. आपत्कालीन कक्ष प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला मेडिसीन विभागात हलवण्यात आले. दरम्यान मेडिसिन तज्ञ डॉक्टर पाराजी बाचेवार यांनी रुग्णाला पाहिल्यावर ताबडतोब त्याच्या रक्ताच्या तातडीने चाचण्या घेणे सुरू केले. आणि सलाईन द्वारे मेडिसिन डॉ. आदित्य नांदेडकर व संबंधितांना सांगितले.
रक्ताच्या चाचण्या केल्या असता रुग्णाच्या शरीरात केवळ एक ग्रॅम रक्त होते. तसेच 30000 पेशींची संख्या होती. त्यामुळे सर्वप्रथम त्याला रात्री एक पिशवी रक्त देण्यात आले. मग काही वेळाने पुन्हा एक पिशवी रक्त देण्यात आले. त्याच्या प्रकृतीला मानवेल असा अंदाज घेऊन डॉक्टराने दर दिवसाला एक पिशवी रक्त देण्याचे ठरवले. त्यानुसार सात ते आठ पिशव्या रक्त लावण्यात आले. रात्री मेडिसीन विभागात मिळालेल्या उपचारामुळे रुग्णाची प्रकृती ठणठणीत आहे. त्याला नुकतीच सुट्टी देण्यात आली आहे. डॉ साक्षी देशमुख, डॉ प्रशांत भोसले, डॉ समृद्धा देशमुख, डॉ सतीश बिराडे यांनी उपचार केले