राजमुद्रा : राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंज ठरली.. या योजनेचे जुलै ते नोव्हेंबर चे पैसे महिलांच्या खात्यात जमाही झाले..आता डिसेंबर महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी दोन लाख कोटींची तुट भरून काढताना दारूच्या दुकानांचे परवान वाढवण्याचे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंधराशे रुपये साठी संपूर्ण महाराष्ट्र बेवडा करण्याचं सरकारचं काम असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे..
याबाबत पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, लाडक्या बहिणींना 1500 रूपये देण्यासाठी लाडक्या बहिणीचे भाऊ आणि नवऱ्यांना ते दारूडे करणार आहेत. प्या दारू. 1500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र ते दारूडा करणार असतील तर ते अत्यंत गंभीर आहे असा टोला त्यांनी लावला.. अजित पवारांसारखा नेता असा विचार करत असेल तर ते दुर्देव म्हणावे लागेल. यशवंतराव चव्हाण, फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावणं अजितदादांनी बंद करायला पाहिजे” अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली.
जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली, त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. त्यानुसार गेल्या 5 महिन्यात कोट्यवधी लाभार्थी महिलाना 7500 रुपये मिळाले आहेत. आचरसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तर या महिलांच्या खात्यात एकदमच जमा झाल्याने त्यांना 3000 रुपये एकत्र मिळाले. एवढंच नव्हे तर आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ असं महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता अर्थसंकल्पात तरतूद झाल्यानंतर लाडक्या बहिणींना नवीन वर्षापासून 2100 रुपये मिळणार असल्याचा आश्वासन देखील दिला आहे.