राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खातेवाटप पार पडल्यानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पालकमंत्रीपदावरून एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.. पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवतील. मला बीडला पाठवलं तर मी जाईन पण त्यापेक्षा गडचिरोलीचं पालकमंत्री पद घ्यावं अशी माझी इच्छा आहे असं त्यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री पदाबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोचली असताना बीड जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे..गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यावेळीही त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र बीडमधील सरपंचांच्या हत्येच्या घटनेमुळे राज्यभरात आक्रोश असून धनंजय मुंडे यांना पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये , ते (पालकमंत्रीपद) मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावं अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता बीडचे नवे पालकमंत्री कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पालकमंत्री पदाचा तिढा सुटता सुटत नसताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर बीड घटनेवरून हल्लाबोल चढवला आहे.. मुख्यमंत्र्यांनी भिडला गेला पाहिजे ते गृहमंत्री आहे त्यांच्या लाडक्या धनु भाऊला घेऊन जावं.. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांचा आकृत जर या सरकार दिसत नसेल तर सरकार माणूसकी शून्य असल्याचा टोलाही त्यांनी लगावला..