जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांचे वडील कै. बळीरामदादा सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत चोपड्याच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, आ. किशोर पाटील, आ. चिमणराव पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, माजी महापौर नितीन लढ्ढा, महानगराध्यक्ष शरद तायडे, गजानन मालपुरे नगरसेवक अनंत जोशी, नितीन बरडे, प्रशांत नाईक, विराज कावडिया तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.