राजमुद्रा : राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. मात्र आता याच योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर पडत असल्याचं दिसत आहे तसेच एकीकडे शिक्षकांचे पगार या योजनेमुळे रखडले असल्याच या बोलले जात आहे. त्यामुळे आता हा ताण कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून वाजवी खर्चाना आता कात्री बसणार आहे.. यामध्ये राज्य सरकारचा ऊर्जा विभाग,समाज कल्याण विभाग, क्रीडा विभागाने इतर विभागातील वाजवी खर्चाला कात्री लावण्याचा सूचना सरकारकडून देण्यात आले आहेत..
विधानसभा निवडणुकीत महत्वाची ठरलेली ही योजना आता सरकारच्या तिजोरीवर भार वाटू लागली आहे.. दरम्यान डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.. एकीकडे खातात पंधराशे रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणी खुश आहेत तर दुसरीकडे आता या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.. यामध्ये आता वाजवी खर्चावर आळा बसणार आहे.
ही महायुती सरकारचे नवीन सुरुवात असून पुढील काळात इतरही विभागात वाजवी खर्चाला कात्री लागणार असल्याची माहिती समोर आली आहे..