राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली.. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले.आता या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले असताना आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली आहे..या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.. ते म्हणाले, पदभार स्विकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन -तीन बैठका झाल्या आहेत, काही निर्णय घेतले आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान या बीड प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे..एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच त्यांच्या पालकमंत्री पदालाही विरोध होत आहे..यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टार्गेट केले जात आहे.. या दरम्यान धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे. मात्र त्यांच्या या भेटीत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत काही चर्चा नाही असं मुंडे यांनी सांगितलं..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी भेटलो होतो.. बीड प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही कुणी काय आरोप केले याबद्दल मी काही बोलणार नाही.. माझ्याकडे जर संशयाने बघितलं जात असेल तर यावर मी बोलणं योग्य नाही.. योग्य काम करीत आहे असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले..