राजमुद्रा : बीड सरपंच हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.. तसेच विरोधकांकडूनही त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.. अशातच आज मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.या भेटीन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला असताना दुसरीकडे अजित पवार यांच्यावरचा दबावही वाढला आहे..अशातच आता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांचं मत सूत्रांकडून समोर आला आहे..संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही. अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
दरम्यान अजित पवार यांच्या भेटीनंतर आज धनंजय मुंडे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजितदादा सोबत भेट झाली असल्याचे सांगितले. तसेच मंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन -तीन बैठका झाल्या आहेत, काही निर्णय घेतले आहेत, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. कोणी काय आरोप करावेत हा ज्याचा त्याचा विषय आहे. असंही त्यांनी म्हटलं.. दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांचे त्यांच्या राजीनाम्याच मतही पुढ आला असल्याचे सूत्रामुळे समजलं… या प्रकरणात एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही, असं अजित पवार यांचं मत असल्याची माहिती समोर आली आहे.
बीडच्या या प्रकरणात बऱ्यापैकी आरोपींना अटक झाली असून अनेक धागेदोरे आता एसआयटी आणि सीआयडीच्या हाती लागले आहेत..न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार, अशी अजित पवार यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही, असं स्पष्ट दिसत आहे..