राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली आणि राज्यात पुन्हा एकदा महायुती सत्तेवर आली..या योजनेचा प्रभाव आता राजधानी दिल्लीत ही पडला आहे..दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडला जात आहे.. या पार्श्वभूमीवरच आता काँग्रेसने महिलांसाठी लाडकी बहीण ऐवजी “प्यारी दीदी योजना” सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबाधणी सुरू केली आहे.. अशातच आता काँग्रेसकडूनही जोरदार आश्वासन जनतेला दिली जात आहेत…कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनीही दिल्लीत या योजनेची घोषणा केली.. राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान प्यारी योजना ही कर्नाटकातील योजनेचा मॉडेल असल्यासही त्यांनी म्हटले आहे.. त्यामुळे या योजनेचा प्रभाव आता निवडणुकीत कितपत पडणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे.. आप ला टक्कर देण्यासाठी भाजप – काँग्रेस पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.. दरम्यान यापूर्वी आपने महिलांसाठी दरमहा एकवीस रुपये देण्याची योजना जाहीर केली आहे त्याला महिला सन्मान योजना असं नाव देण्यात आला आहे.. त्यासाठी अर्ज भरण्यास ही सुरुवात करण्यात आली आहे मात्र निवडणुकीनंतरच दिल्लीतील महिलांना या योजनेचा फायदा मिळू शकणार आहे.. आता काँग्रेसने सुरू केलेल्या योजनेचा प्रभाव निवडणुकीनंतर किती पडू शकतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.