राजमुद्रा : दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असताना आता दिल्लीतील” इंडिया गेट “च्या नावात बदल करण्याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे.. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत इंडिया गेट चे नाव बदलण्याची मागणी केली आहे.. त्यांच्या या मागणीमुळे आता नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.
भाजपचे नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहीत इंडिया गेट हे नाव बदलून “भारत माता द्वार” हे नाव लिहावे असं पत्रात म्हटलं आहे. त्यांनी या पत्रात असं म्हटले आहे की, इंडिया गेटवरील किंग जॉर्ज पंचमची मूर्ती हटवून सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती उभारली. राज पथाचे नाव कर्तव्य पद केलं..त्याचप्रमाणे इंडिया गेटचं नाव बदलून भारत माता द्वार करावा असं त्यांनी म्हटले आहे..आता या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.. दरम्यान या इंडिया गेट ऐवजी भारतमाता द्वार हे नाव दिल्याने त्या स्तंभावरील हजारो शहीद देशभक्तांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली जाईल.. माझ्या प्रस्तावाचा विचार करून भारत माता द्वाराचा नामकरण करावं असंही भाजपाचे जमाल सिद्दिकी यांनी पत्रात नमूद केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपा नेत्यांनी केलेल्या या मागणीने नव्या वादाला तोंड फुटणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.. दिल्लीतील इंडिया गेटला युद्ध स्मारक म्हणून ओळखला जात. या ठिकाणी शहीद भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिले जाते प्रजासत्ताक दिन इंडिया गेट पासूनच परेड सुरू होतं या परेडमध्ये तिन्ही दलाचे जवान सहभागी होतात.. तसेच पर्यटकांसाठी हे गेट महत्त्वाचे आकर्षण आहे..