राजमुद्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर महिन्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर आता शासकीय आदेशांची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली.
मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत अभिजात भाषेची अधिसूचना स्वीकारण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले होते.
त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी त्यांच्याकडे आदेशाची अधिसूचना त्यांच्याकडे सुपूर्द केली.. त्यानंतर ते असे म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरीता पाठपुरावा करणारी समिती उपस्थित होती. त्यानंतर काही वेळापूर्वीच केंद्रीय सांस्कृतीक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी माझ्या हाती मराठी अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील अधिसुचना असलेले पत्र दिले. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे स्वप्न होतं, ते आज पूर्ण होत आहे”, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
देशातील तामिळ,तेलगु, संस्कृत,कन्नड,मल्याळम आणि उडीया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील सातवी भाषा ठरली आहे..