राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.. हा पराभव आता आघाडीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्याचा निकाल लागून दीड महिने लोटल्यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेटीवार यांनी केलेल्या गंभीर आरोपाने महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्यांनी कोणाचाही नाव न घेता आपल्या सहकार्यांवर संशय व्यक्त केला आहे.. तसेच आपल्याच सहकाऱ्यांकडून भाजपला अप्रत्यक्षपणे मदत केल्याचही सुचित केला आहे.. त्यांच्या या गंभीर आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडी आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागली असताना आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने विधानसभेतील पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत एकमेकांचे चांगलेच उट्टे काढले. काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याच सहकाऱ्यांना टोला लगावला आहे. बैठकीची वेळ अकरा वाजता असायची आणि यायचं दुपारी दोन वाजता असे अनेक नेते उशिरा येत होते मी त्यात कोणाचाही नाव घेणार नाही यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला.महाराष्ट्रात आवडीचा जवळपास दोन दिवसात संपला असता तर आम्हाला नक्कीच फायदा झाला असता अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.. दरम्यान वेळ वाया घालवण्यामध्ये काही षड्यंत्र किंवा प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही असंही वडेटीवर यांनी म्हटलं आहे.. त्यामुळे महाविकास आघाडीत चांगलीच ठिणगी पडली आहे..
दरम्यान कालपासून आघाडीतील बिघाडी ही सत्ताधाऱ्यांना आनंदाचा उकळ्या फुटण्याचा कार्यक्रम झाला आहे. आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने इंडिया अलायन्सची जबाबदारी घेणार नाही, असे जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले.. नाहीतर इंडिया आघाडी पुन्हा निर्माण होणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे.