राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव हा नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे . गेल्या काही दिवसांपासूनच आघाडी फुटणार असल्याच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सर्व काही सुरळीत आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे..तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आल असतानाच आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या महिन्याभरात मोठा भूकंप होणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पवार गट लवकरच महायुतीत सहभागी होईल असा मोठा दावा त्यांनी केला आहे.. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत..
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडी कामाला लागली असताना आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट विधानसभेतील पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत एकमेकांचे चांगलेच उटे काढत आहेत .. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मिठाचा खडा टाकला. त्यानंतर आघाडीतील नेते महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.. यावरूनच आता शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी मोठं भाकित वर्तवलं.. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका आपण दिवसेंदिवस बदलताना पाहतोय याचा अर्थ असा होतो की, त्यांना सत्तेत जायचं आहे पण ते सत्तेत आल्याशिवाय राहू शकत नाही.. त्यांचं मन परिवर्तन होऊन युतीच्या बरोबर येण्याचा किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील असा मोठा दावा शिरसाठ यांनी केला आहे.. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात मोठा भूकंप होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे..
दरम्यान नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत अनेक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा मुद्दा मांडण्याची माहिती समोर आली आहे.. या बैठकीत विशेष म्हणजे पक्षात दोन प्रवाह आहेत.. एका गटाचे म्हणणे आहे की, महायुतीत सहभागी व्हावं तर दुसऱ्या गटाचा म्हणणं आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात पक्ष विलीन करून सत्ते सहभागी व्हावं असं म्हटलं असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे आगामी काळात शरद पवार गट महायुती सामील होणार का? याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.