राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातुन संताप व्यक्त केला जात होता.. या प्रकरणाला एक महिना उलटून गेला तरी सर्व आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही..मात्र सध्या या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मीक कराड हा कोठडीत आहे..आता त्याच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे..या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणी आता वाढणार आहेत..
सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या बाचाबाची नंतर सुदर्शन घुले यांनी वाल्मीक कराड यांना फोन केला होता..६ डिसेंबरला मस्साजोगच्या पवनचक्की प्लॉटवर जाण्याआधी त्यांच्यात दोन वेळा संवाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.. यानंतर ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपींना अटक केली असली तरी अद्याप बाकी आरोपी अजून मोकाट आहेत..दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चाआयोजन करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने आज वाशिममध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या हत्याप्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड याची सीआयडी कडून चौकशी सुरू असून मंत्री धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्तीय असल्याने त्यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समित्या नेमण्यात आले आहेत.. मात्र अद्याप या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली नाही.. दरम्यान वाल्मीक कराड हा आता अडचणीत सापडणार आहे..