राजमुद्रा : महायुती सरकारने शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांची सिडकोच्या अध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्णी लावली होती.. नुकतच महायुतीच सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदाची लॉटरी लागून ही महामंडळावर ठाण मांडून बसलेल्या शिरसाट यांना राज्य सरकारकडून पदावरून हटवण्यात आला आहे.
एकीकडे सरकारने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवला आहे तर दुसरीकडे भरतशेठ गोगावले यांनाही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून मुक्त केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता या अध्यक्षपदावरून महायुतीच्या आमदारामध्ये जोरदार लॅबिग सुरू झाली आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये मंत्रीपदी निवड झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मंत्रिमंडळात वर्णी लागून महिना उलटून गेला तरी शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. उलट सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला होता. यानंतर आता सरकार ॲक्शन मोडवर येऊन त्यांनी संजय शिरसाठ यांना पदावरून हटवला आहे.. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.