शिंदखेडा राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्यात आगामी होणाऱ्यां नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करुन शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणमध्य दिनांक १२ जुलै २०२१ पासुन ते दि. २४ जुलै २०२१ पर्यंत शिवसेना प्रत्येक पंचायत समिती गण व नगरपालिकेच्या वार्डा-वार्डात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविले जाणार असल्याची माहिती शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी पत्रकान्वये दिली आहे.
नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलाविली होती. सदर ठिकाणी या बैठकीत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक पंचायत समिती गण व नगरपालिका प्रभागात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविण्याचे आदेश केले होते. त्यानुसार धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा विधानसभा मतदार संघ व शिरपूर विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क मोहिमेची सुरुवात शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील बेटावद गटातील वारुळ गणात वारुळ येथे बैठकीचे आयोजन केले आहे. सदर अभियानाची सांगता दिनांक २७ जुलै २०२१ रोजी शिरपूर शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातील बैठकीसह होणार आहे.