राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून महाविकास आघाडीला चांगलच खिंडार पडला आहे.. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाला याचा चांगलाच फटका बसला असला असताना आता शरद पवार गटालाही गळती लागणार आहे.. अजितदादा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या एका नेत्याच्या प्रवेशावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला असून शरद पवार गटाला ही मोठा धक्का बसला आहे.
शरद पवार गटातील नेत्यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना त्यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर भेटले होते. त्यांची दादांसोबत सखोल चर्चाही झाली. पण याबाबत निर्णय झाला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.. ते निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आमचा विधानसभेचा उमदेवार विजयी झाला आहे, असं सांगतानाच संजीवराजे यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे राज्यसभा सदस्य नितीन पाटील आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील यांच्याशी चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.. विधानसभा निवडणुकीत आघाडीचा झालेला पराभव नेत्यांच्या चांगला जिव्हारी लागला असून आघाडीतून बाहेर पडून महायुतीत इनकमिंग केले जात आहे.
आगामी असणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता असल्याचही सुनील तटकरे यांनी वर्तवली आहे..तसेच आता इनकमिंग चांद्यापासून बांद्यापर्यंत जोरात आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.. त्यामुळे आता ठाकरे शरद पवार गटाला ही धक्का बसणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे..