राजमुद्रा : राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे चर्चा जोरदार रंगली असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी दोन्ही शिवसेना एकत्र जोडता येतील असं वक्तव्य केलं होतं.. त्या वक्तव्यानंतर आता चार दिवसातच त्यांनी आपल्या भूमिकेवरून यूटर्न घेतला आहे.. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून शिरसाठ यांनी भूमिका बदलली असा सवाल उपस्थित केला जात आहे..
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मी एकत्र आणणार असा वक्तव्य केलं होतं.. या वक्तव्यानंतर भाजपने याला आक्षेप नोंदवला होता..वक्तव्य करण्याआधी त्यांनी एकनाथ शिंदे यांना विचारलं होतं का? अशी प्रतिक्रिया भाजप नेते नितेश राणे यांनी केली होती दोन्ही शिवसेना एकत्र येन ही गोष्ट खटकत असल्याचा त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं होतं.. त्यानंतर चार दिवसातच कोणाच्या सांगण्यावर शिरसाट यांनी भूमिका बदलली असा सवाल उपस्थित केला जात आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा स्वीकारले आहे त्यांच्याकडे हिंदुत्व राहिले कुठे आहे..त्यामुळे आम्ही कधी एकत्र येऊ शकत नाही असं शिरसाट वादानंतर म्हणाले.. त्यामुळे काही चार दिवसातच ही भूमिका कशी बदलली असा सवाल राजकीय वर्तुळात रंगला आहे.. त्यांनी बदलल्या भूमिकेवरून संजय शिरसाट भाजपकडून की शिंदेंच्या शिवसेनेकडून असाही सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला आहे..