राजमुद्रा : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवला.. मात्र त्यांनी ही निवडणूक भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून जिंकली.. आता त्या विरोधात पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी एडवोकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे.. तसेच शिरसाट यांची निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या निवडणुक याचिकेत न्यायमूर्ती के. सी.संत यांनी प्रतिवादी राज्यशासन,निवडणुक आयोग,,जिल्हाधिकारी, मंत्री संजय शिरसाठ यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजू शिंदे यांचा 16351 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.. आमदार शिरसाट मागील पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठित केली होती.. अखेर या निवडणुकीत त्यांनी जोरदार बाजी मारली.. त्यांच्या या निकाला विरोधात आता पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.. तसेच निवडणुकीच्या दिवशीही वाळूज भागात विरोधी उमेदवार राजू शिंदे यांना मतदान होत असल्याने शिरसाठ यांनी पोलिसांना सांगून लाठी चार्ज करण्यास सांगितला याची तक्रार शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट कलम 125 नवीन संजय शिरसाठ हे मतदारांना पैसे वाटप करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडून आलेले आहेत.. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी शिंदे यांनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी होणार आहे..
मंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या पथकाने सातारा पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान दुसऱ्या प्रकरणात मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप झाला असून याचा फायदा राजकीय शिवसेनेला मिळावा यासाठी हा प्रयत्न असल्याचा निर्णय नमूद केला आहे.. याचबरोबर जवाहर नगर पोलिसांना संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आयोगाच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.. या याचिकामुळे संजय शिरसाठ यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..