राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयात पुणे आणि सातारकर यांच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून अभय योजनेची वर्षभराची मुदत वाढ देण्यात आली आहे.. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढील प्रमाणे –
1. पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या (ता. मुळशी) गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे आणि धरण मजबुतीकरणाच्या कामांसाठी 315 कोटी 5 लाख रूपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता.
2. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या 25 प्रकल्पांसाठी 170 कोटी रूपयांच्या तरतूदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता.
3. शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदत वाढ.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून त्यांच्या मुहूर्तानुसार माहिती सरकारच्या मंत्री पदाचे पदावरून आल्यानंतर विभागाचा आढावा या सर्व गोष्टी पार पडल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रत्यक्ष कामकाज आणि बैठकांना सुरुवात झाली आहे त्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या रजा मंत्री मंडळाच्या बैठकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 डेज अर्थात मागील तीन वर्षात आणि त्यापूर्वीच्या कार्यकाळात रखडलेली कामे विविध विभागांच्या 100 डेजच्या कामात समावेश केला आहे. त्यानुसार या बैठकीत तीन निर्णय घेण्यात आले आहेत.