राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांना कोणतेही स्थान देण्यात आलं नसल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.. या सर्व घडामोडी दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास खलबत झाली असून या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..
मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली.. या चारशे नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ही भेट राजकारणाविषयी बोलण्यासंदर्भात नव्हती.. असं त्यांनी स्पष्ट सांगत . ‘ आज मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याच खरं कारण म्हणजे आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राउंड ला भिंत टाकायची आहे त्यांना घर पाहिजे आहे.. ज्यादा पोलीस फोर्स पाहिजे आमच्या इतर काही फायली देखील आहेत.. मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृहमंत्रालय सुद्धा आहे, त्यामुळे मी भेटायला आलो होतो.. उदाहरणार्थ आमच्या लासगाव कमिटीचं थोडं काम आहे. एस गाववरून आम्हाला येवल्याला पाणी आणायचं आहे त्याची फाईल आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पडून आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उद्यानाला असताना छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार का? या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यावरही त्यांनी बोलताना त्यांनी ही भेट कोणत्या राजकीय कारणास्तव नसल्याचं स्पष्ट सांगितलं.दरम्यान दर मंगळवारी राष्ट्रवादीची आढावा बैठक होते, या बैठकीबाबत देखील भुजबळांना विचारण्यात आलं. यावर बोलताना जीथे माझी गरज नाही तीथे मी जात नाही, असं म्हणत त्यांनी बोलण टाळलं.