राजमुद्रा : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सातत्याने भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल करत असतात. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का येत नाहीत असा सवाल उपस्थित करत खळबळजनक दावा केला होता. या दाव्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांना सणसणीत टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी गंगेत जाऊन स्नान कराव म्हणजे केलेली पाप धुतली जातील. शिवसेना फोडण्याचा मोठा त्यांनी केलं असल्याचा टोला त्यांनी लगावला.
शिवसेना ठाकरे काळाचे संजय राऊत यांनी भाजपच्या कोणाच अशी चर्चा आहे की कामाख्या देवीसमोर रेड कापली आणि त्याचे शिंगं वर्षा बंगल्यावर लोन मध्ये खोदकाम करून पुरली आहे. तस तिथला स्टाफ आणि त्यांचे लोक सांगतात असा खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक झाले असून त्यांनी संजय राऊत आणि याच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.. संजय राऊत हा सडलेला आंबा असून त्यांना शिंदे साहेबांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही.. शिंगा शिवाय त्यांना काही दिसत नाही पण ही ती शिंग आहे ज्यांनी ती गुवाहाटीला जाताना अंगावर घेतली होती.. तू वेडा माणूस आहे त्याला चौकात आणलं पाहिजे शिवसेना स्टाईलने सांगितलं पाहिजे असा हल्लाबोल पाटलांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीच सरकार स्थापन झाल असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे देण्यात आली.. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव हा नेत्यांच्या चांगला जिव्हारी लागल्यानंतर त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल आरोपत्यारोप करण्यास सुरुवात केली.. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत हे वारंवार सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. दरम्यान यावरून बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. मागच्या दोन अडीच वर्षात राष्ट्रवादी शिवसेना या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे हे पक्ष फोडण्यामागे खासदार राऊत यांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..