राजमुद्रा : राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आणण्यात गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असतात.. या योजनेतून महिलांना दरमहा पंधराशे रुपये खात्यात जमा करण्यात येत होते.. मात्र आता अपात्र लाडक्या बहिणीच्या अर्जाची फेर तपासणी सुरू असून त्यातून अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरले आहेत.. यावरून आता प्रहार चे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे..सतेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकी वेळी सरकारने त्यांची मते घेतली आता मात्र त्यांचे पैसे बंद करण्यात येत आहेत.. ही तर त्यांची फसवणूक असल्यामुळे लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ जुलै महिन्यात घोषणा केली होती.. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलेला पंधराशे रुपये देण्यात येतील असा त्यांनी शब्द दिला.. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये करण्यात येईल असं आश्वासन देखील देण्यात आलं.. मात्र सत्तेत येऊनही 2100 रुपये ची पूर्तता सरकारने केली नसल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल चढवला जात आहे.यावरून आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनीही या योजनेवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत..लाडक्या बहिणींना ॲडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत, असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडल. लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाने पारदर्शक विचार करून चौकशी केली पाहिजे असेही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्यासाठी सरकारने मतं घेतली, मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असेही कडू म्हणाले.दरम्यान पुणे जिल्ह्यातील 38 बहिणींनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे. आधी 8 महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सरकारने या लाडक्या बहिणीचे फसवणूक केली असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे..