(राजमुद्रा जळगाव) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील वाळलेल्या आणि वादळात कोलमडून पडलेल्या झाडांचे एकत्रीकरण करून लिलाव करण्यात येणार होता. मात्र महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांना या संदर्भात माहिती मिळतात विद्यापीठ व्यवस्थापनाशी संपर्क साधून चर्चा करून या झाडांचा सकारात्मक उपयोग करण्यात यावा या संदर्भात बोलणी करण्यात आली.
याबाबतीत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांना माहिती मिळताच विद्यापीठ व्यवस्थापनाशी संपर्क करण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाला या लाकडांचा लिलाव न करता ही लाकडे गोरगरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी मनपा प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात यावी असे सुचवले. विद्यापीठ व्यवस्थापनातर्फे या मताला प्रतिसाद देत ही एकत्रित करण्यात आलेली आलेली लाकडे आज (ता 8) मनपा प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आली.
याप्रसंगी कुलगुरू ई. वायुनंदन, प्र-कुलसचिव डॉ.शा.रा. भादलीकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे तसेच विद्यापीठ कर्मचारी उपस्थित होते. संबंधित लाकडे महापालिकेकडे हस्तांतरित होताच महापौर जयश्री महाजन यांच्या सूचनेवरून महापालिकेतर्फे विविध वाहनांच्या मदतीने जळगावातील ठिकठिकाणच्या स्मशानभूमीत तत्काळ वाहून नेण्यात आले. ही लाकडे शहरातील विविध भागांतील गोरगरीब जनतेला अंत्यसंस्कारासाठी मोफत दिली जाणार आहेत.