पाचोरा राजमुद्र वृत्तसेवा | पाचोरा येथे स्वामी लॉन्स येथे मराठी पत्रकार संघाच्या दिमाखदार कार्यक्रमात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर यांनी कोरोनासारख्या भयावह परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केली. देशमुखवाडी भागातील स्वतःचे हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोलाचे योगदान दिले होते. याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. भूषण मगर यांनी सांगितले की; हा आरोग्यसेवेचा यज्ञ यापुढे सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. किशोर आप्पा पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, यासह जिल्हाभरातील शिवसैनिक आणि धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.