मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. या भेटी प्रसंगी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली आहे.
ना. खडसे यांच्या पाठीमागे सध्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील विविध पक्षांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. या भेटीत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असल्याचे समजते. ईडीच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांचा छळ सुरू असल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी देखील आता मैदानात उतरली असून लवकरच राष्ट्रवादीच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात निषेध अभियान सुरू करणार असल्याचे समजते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, दिलीप माहेश्वरी, युवा नेते परेश कोल्हे उपस्थित होते.