जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | श्री संताजी जगनाडे महाराज बहुद्देशीय तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाची सभा अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल स्टार पॅलेस येथे नुकतीच पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या ठरावा मध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये वधु-वर पालक परिचय मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच समाजासाठी समाजाचा स्वर्ग रथ तयार करण्याचा मानस करण्यात आला. तसेच संस्थेच्या आजपर्यंतच्या आर्थिक ताळेबंद मांडण्यात आला.
याप्रसंगी नंदुभाऊ चौधरी, सीताराम देवरे, संतोष चौधरी, रवींद्र चौधरी, बी एन चौधरी, डी ओ चौधरी, व्ही आर पाटील, प्रभाकर महाले, दशरथ चौधरी, अनिल पाटील, प्रशांत सुरळकर, रामचंद्र चौधरी, विनोद चौधरी, भगवान चौधरी, किरण चौधरी, भगवान चौधरी, मधुकर देवरे, कमलाकर चौधरी, भिकन चौधरीम, सुभाष चौधरी, तुषार पाटील, दीपक चौधरी, मेघशाम चौधरी, अनंत चौधरी, संतोष चौधरी आदी उपस्थित होते. सुत्रासंचालान अनिल पाटील यांनी केले तर आभार दशरथ चौधरी यांनी मानले.