(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आदिवासीयांच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याने प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. खावटी अनुदान योजनेतील कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. दरम्यान जिल्हातील आदिवासी बांधवाना सरकारकडून २४ कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज आदिवासी खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे बहुतेक जण जेरीस आले आहेत. यामुळे आदिवासी समाजासमोरही अनेक समस्या उभ्या आहेत. यांची दखल घेत राज्य सरकारने १२ ऑगस्ट २०२० च्या नियमानुसार २०१३ पासून बंद पडलेल्या आदिवासी खावटी योजनेला पुनर्जीवित केले.