(रावेर राजमुद्रा वृत्तसेवा) रावेर ग्रामसेवकांचे खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरणावर माझ लक्ष आहे. या प्रकरणाची मी स्वता: लक्ष घालून चौकशी करणार आहे. चुकी केली असेल तर माफी कोणालाच मिळणार नसल्याचे जळगाव जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी सांगितले.
रावेर तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी सोईच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणुन खोटे अपंग प्रमाणपत्र काढल्याची माहिती अधिकारातुन उघड झाले. परंतु या प्रकरणाला खरी दिशा तेव्हा मिळाली जेव्हा यातील काही ग्राम सेवकांनी खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरणात सेटलमेंट करून दडपण्यासाठी प्रयत्न सुरु केला. परंतु या प्रकरणात आता जळगाव जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी लक्ष घातले आहे.