जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | संपूर्ण राज्यात बीएचआर प्रकरण गाजत असताना महत्वपूर्ण खुलासे समोर यायला सुरुवात झाली आहे, या प्रकरणी बडे उद्योजक व व्यावसायिक असलेल्या दिग्गजांना अटक करण्यात आली होती आज पुणे येथील न्यायालयात जामीन होण्या संदर्भात कामकाज होणार असून न्यायालय नेमकं कोणाचा जामीन करेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे, बीएचआर प्रकरणात अनेक जण आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याच्याचे सांगण्यात येत आहे मात्र आज संशयीत असलेल्या पैकी कोणाला जामीन मिळत या वर बीएचआर प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे.
आमची सुटका करा आम्ही व्याजा सकट बीएचआर पतसंस्थेचे पैसे भरण्यास तयार आहोत असे हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांनी सांगितले होते यामुळे बाकीच्या संशयित आरोपींनी देखील पैसे भरण्यास सहमती दर्शवली होती.
बीएचआर प्रकरण राज्यात पटलावर आल्या नंतर ठेवीदारांमध्ये दिलासादायक असे वातावरण तयार झाले आहे आपल्या ठेवीचेचे पैसे आपल्याला परत मिळणार असा आशेचा किरण ठेवीदारांमध्ये दिसून आला आहे