जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे सध्या जिल्हा परिषदेतील विविध विषयांचा आढावा घेत आहेत. सर्व विभागांच्या सामूहिक बैठका घेऊन त्यांना सूचना देण्याऐवजी त्यांनी प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुख अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र आढव्यावर भर दिला आहे.
पहिल्याच दिवशी सामूहिक बैठकीच्या तयारीने आलेल्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी केवळ ओळख परिचय झाल्यावर परत पाठविले होते. सामूहिक बैठकींऐवजी एका वेळी एकाच विभागाची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर गेला आठवडाभर अधिकाऱ्यांकडून विभागाचा होमवर्क आणि बैठकीची तयारी सुरू केली आहे. दिनांक 16 जुलै रोजी लॉकडाउन नंतरची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते सर्व विभागांची माहिती अजिंठा वरील विषयाच्या अनुषंगाने तयारी करीत आहेत.