पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात गाजावाजा झालेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी घोटाळा प्रकरणी आज पुणे न्यायालयाने याप्रकरणातील संशयित आरोपी ११ जणांचे जमीन अर्ज मंजूर केले आहेत. त्यात प्रामुख्याने अंबादास मानकापे, जयश्री तोतला, प्रेम कोगटा, भागवत भंगाळे, छगन झाल्टे, जितेंद्र पाटील, जयश्री मणियार, संजय तोतला, प्रितेश जैन आदी जणांची न्यायालयाने जामीन दिला आहे.
या प्रकरणात राज्यातील अनेक बडे उद्योजक, व्यावसायिक, राजकीय समर्थक असलेल्या अनेक दिग्गजांना अटक झाली होती. पुणे येथील न्यायालयात जामीन होण्यासंदर्भात कामकाज झाले. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन वेळा राज्यात छापा टाकून यासंबंधी काही संशयित आरोपींना गजाआड केले होते. परंतु याप्रकरणातील काहींनी ‘आम्ही पैसे भरण्यास तयार आहोत आमचा जामीन मंजूर करण्यात यावा’ अशी मागणी केली होती. त्यात जळगावातील व्यावसायिक भागवत बंगाळे यांच्यासह अनेक संशयित आरोपींचा समावेश होता.