(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) आज जळगाव येथे आरोग्य विषयक विकासासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र भैयासाहेब पाटील यांनी चर्चा केली. तसेच कोविड रुग्णांची संख्या पाहता कोविड रुग्णालयांचे नॉन- कोविड मध्ये रुपांतर करण्यात यावे, अशी मागणी केली.
कोरोना काळात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण व वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँगेस तर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैयासाहेब पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी पत्रकार दिपक नगरे उपस्थित होते.