(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) नेत्रज्योती चॅरिटेबल हॉस्पिटल येथे दि. १५ जुलै रोजी ऑर्थोपेडिक तपासणी विभाग व स्त्रीरोग तपासणी विभागाची कायम स्वरुपी सुरुवात करण्यात आली. सदर विभागाचे उद्घाटन ट्रस्टचे चेअरमन गुरुमुखदास जगवणी यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे व्हा. चेअरमन दिलीपकुमार मंघवाणी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी, कोषाध्यक्ष शंकरलाल थोरानी, मनोहरलाल जाधवानी, धनराज चावला, रमेशलाल मंधान व सर्व ट्रस्टीगण उपस्थित होते.
ऑर्थोपेडिक विभागात अस्थिरोग तज्ञ डॉ. शौनक रमाकांत पाटील आणि गायनेक विभागात स्त्रीरोग तज्ञ डॉ. योगिता शौनक पाटील यांनी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत तपासणी करतील. सदर सेवेचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ घेता येईल असे ट्रस्टचे पदाधिकऱ्यांनी कळवले आहे. सदर प्रसंगी नेत्ररोग तज्ञ डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील, जनरल फिजिसियन डॉ. मोहनलाल साधरिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॉस्पिटल अडमिनीस्त्रेटर डॉ. सुचंद्र चंदनकार, नितीन झोपे, राजेंद्र कुवर, जया रेजडा यांनी परिश्रम घेतले.