(राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोना उपचारादरम्यान लागत असणाऱ्या औषधी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तसेच लस आदींवरचा GST पूर्णपणे माफ केल्यास याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. कोरोना साठी लागणाऱ्या औषधी तथा सामग्रीवरच्या आयतीवरचा आणि पुरवठ्यावरचा GST माफ केला तर या वस्तूंच्या किमती कमी न होता उलट वाढणार असून याचा परिणाम नागरिकांवर होणार असल्याची माहिती अर्थमंत्री सीतारमण यांनी दिली आहे. GST माफ केल्यास या वस्तूंच्या उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाच्या कराचा परतावा मिळणार नाही परिणामी या औषधी व साधन सामग्री महाग होतील असेही त्या म्हणाल्या.
देशात सध्या कोरोनाच्या परिस्थितीने हाहाकार माजवला असून GST मध्ये सूट मिळावी अशी अपेक्षा आहे. यावर जीएसटी सूट मिळाल्यावर नेमक्या कोणत्या परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माहिती दिली. उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा इनपुट क्रेडिट टॅक्सवर म्हणजेच प्रत्येक टप्प्यावर भराव्या लागणाऱ्या करांमध्ये लाभ मिळणार नाही, परिणामी नागरिक या बोजाखाली दाबले जाऊन महाग किमतीची सामग्री व औषधे तसेच लसी खरेदी कराव्या लागतील असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. यावरून GST मध्ये सूट ही नागरिकांसाठी धोक्याची असल्याचे चित्र दिसत आहे.
सर्वत्र नियम मिशीला चांगले केले आहे ? म्हणजे काय ? की नियम वेशीला टांगले गेले आहेत. असे हवे होते.