(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) घरफोडी सह मोटरसायकलच्या चोऱ्या करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याला पुढील तपास कामी चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शांताराम उर्फ सान्या प्रताप कोळी (वय 36) रा पाडळसे, ता. अमळनेर हल्ली मुक्काम माचला ता. चोपडा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला चोपडा तालुक्यातील माचला येथून ताब्यात घेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने शांताराम कोळी यास ताब्यात घेतले असता त्याने चोपडा पोलिस स्टेशन शहर हद्दीत मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे. तसेच अंमळनेर व चोपडा तालुक्यात दारू व किराणा दुकानात घरफोडी व चोर्या केल्याचे कबूल केले आहे. त्याच्यावर अडावद, अमळनेर, चोपडा ग्रामीण अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
अधिक तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ अनिल जाधव, अशरफ शेख, इंद्रिस पठाण, दीपक शिंदे, अशोक पाटील हे करत आहेत.