जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील मास्टर कॉलनी येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर बाजाराचे वृत्त माध्यमातुन छापून आल्यावर देखील प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोणाच्या परवानगीने हा बाजार रात्रीच्या वेळेत थाटण्यात येतो आहे. कोरोनाचे भयंकर संकट असतांना रुग्ण वाढ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लॉकडाऊन सोबतच कडक निर्बंध लावण्यात आले असताना सर्वत्र नियम वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहेत. हजारो लोकांची गर्दी या बाजारात होताना दिसून येत आहे. स्थानिक वृत्तपत्र, न्यूज मीडिया यांनी वेळोवेळी घटनाक्रम उघडकीस आल्यावर देखील जिल्हाप्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प्रशासनाचा हा दुजाभाव जळगावकरांच्या जीवावर उठणारा ठरला आहे.
कोरोनामुळे अनेक नागरिकांनी जीव गमावले असताना ह्या बाजारात मात्र गर्दी होत आहे. मुंबईतील भेंडी बाजारातील बुध बाजार प्रमाणे रात्रीच्या वेळेत सर्वत्र शहरात शुकशुकाट असताना मास्टर कॉलनीत मात्र हा बाजार भरल्या नंतर रात्री ” जत्रेचे ” स्वरूप येत असून जिल्हाप्रशासनाची भूमिका याबाबत संशयास्पद वाट देणारी आहे. कोणाच्या तरी आशीर्वादाने हा बाजार भरला जात असावा त्याशिवाय पोलिसांना ही माहिती कशी मिळाली नाही? नेहमी सतर्क असणारे जळगाव पोलीस मोठ्या गुन्ह्याचा तपास सहज लावतात मात्र शहरात रात्रीच्या अंधारात चालत असलेल्या खेळाकडे कसे दुर्लक्ष करण्यात आले? याबाबत विविध तर्क लढवले जात आहे.
महिला पत्रकाराला धमकी
याबाबतचे वृत्त घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार नाजणीन शेख यांना लाईव्ह चित्रकरण करत असताना स्थानिक टवाळखोरांनी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात टवाळखोरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. महिला पत्रकार नाजणीन शेख यांच्या पाठीशी राज्य पत्रकार संघ भक्कमपणे पाठशी उभे असल्याची प्रतिक्रिया प्रवीण सपकाळे यांनी दिली आहे.
काम मस्त केले आहे कोरोणाचा वाढता प्रार्दुभाव पहाता काम सलुट मारण्या सारखे आहे याला म्हणतात मिडिया