(धरणगाव राजमुद्रा वृत्तसेवा) गट विकास अधिकारी स्नेहा कुडचे यांच्या सूचनेनुसार धरणगाव तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गाव कृती आराखडा प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. सदर प्रशिक्षणार्थीना प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिती शिक्षण व संवाद तज्ञ निलेश रायपुरकर, कनिष्ठ अभियंता राजतिलक विजय सोनार तसेच गट समन्वयक सपना पाटिल यानी दिले.
प्रत्यक्ष गाव कृती आराखडा करण्यापूर्वी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या समस्या तसेच गाव कृति आराखडा (DPR) करण्यापूर्वी प्राथमिकता समजावी यासाठी सदर उजळनी प्रशिक्षण घेण्यात आले. समूह समन्वयक अमित तडवी यांनी प्रशिक्षण आयोजन सहकार्य केले. यावेळी गाव कृती आराखडा तात्काळ सादर करण्याच्या सूचना स्नेहा कुडचे यांनी ग्रामसेवकांना दिल्या.