(चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरवासीयांसह व्यापारी त्रस्त आहेत. यामुळे पालिकेच्या दोन्ही गटनेते, नगराध्यक्ष, अधिकारी यांच्या समन्वयातून छत्रपति शिवाजी महाराज पुतळा ते दयानंद चौक, नवजीवन सुपर शॉप ते रींग रोड, गणेश रोड मंदीर ते शिवाजी चौक, अंध शाळा ते शिवाजी चौक तसेच कॅप्टन कॉर्नर ते नारायणवाडी या सुमारे दीड कोटी रूपयांच्या खर्चातून रस्त्यांची दुरुस्ती मार्गी लावा. यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करणार असुन येत्या आठवडाभरात दुरुस्त्या संपवा अशी सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी आज येथे केली.
आज शहरातील व्यापारी बांधवांनी रस्त्यांच्या दूर्दशेबाबत खासदार उन्मेश पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी वरील माहिती दिली. बैठकीला नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे, गटनेते संजय पाटील, नगरसेवक नितिन पाटील, विश्वासराव चव्हाण, व्यापारी आघाडीचे अजय वाणी, पालिका अधिकारी भूषण लाटे, हरेश जैन, प्रितेश कटारिया, राहुल करवा आदी उपस्थित होते. यावेळी व्यापारी बांधवांनी रस्त्यावर झालेल्या धुळीमुळे, चिखलामुळे आम्ही त्रस्त असुन आमची अडचण आपणच दूर करा अशी विनंती खासदार उन्मेश पाटील यांना केली. किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे संचालक अजय वाणी, श्याम भाऊ शिरोडे ,सोमनाथ ब्राह्मणकार, लक्ष्मण दुसे, पप्पू दुसे, राजू भाऊ पाटणी, जितेंद्र येवले, श्याम वाणी, दीपक वाणी कापड असोसिएशनचे प्रितेश कटारिया, हार्डवेअर असोशियन चे विवेक येवले,स्वप्निल धामणे व इतर व्यापारी बांधव उपस्थित होते.
यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी दीड कोटी रुपयांच्या खर्चातून लगेच तातडीने दुरुस्ती सूरू करावी असा आदेश देत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून रस्त्यांची तांत्रिक मान्यता तातडीने मिळवुन दिली. जिथे अडचण असेल ती तात्काळ दुर करा परंतू येत्या आठवडाभरात ही दुरुस्तीची कामे संपवा असे आदेश यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी प्रशासनाला दिले.