पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा | (अनिल आबा येवले) एरवी सहवासाची दोन पाच वर्षे जरी सोबत झाली तरी अनेकदा जवळच्या नात्यातील सहवासातही दुरावा येतो. परंतु आमदार किशोर पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांच्या सहवासाला मात्र दोन दशकांपेक्षा अधिक काळ अर्थात एकवीस वर्षे होऊन देखील नात्यातील ओलावा मात्र कायम आहे.
हे नाते अधिकच वृद्धिंगत होत गेले आहे. लहान मोठे भाऊ जसे एकमेकाला सांभाळतात तसाच जिव्हाळा त्यांच्यात कायम पहावयास मिळत असल्याने अनेकांना याचे आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. पाचोरा- भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कामाची जबाबदारी सांभाळणे म्हणजे एक अग्निदिव्यच. अप्पांच्या कामाचा प्रचंड आवाका, कामांचा उरक आणि सतत जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्यांची सोडवणूक, मतदार संघातील प्रश्न, त्यांचा पाठपुरावा, सततचा प्रवास, विकास कामांसाठी लागणारा निधी, अधिकारी, पदाधिकारी यांच्यातील समन्वय व संवाद, प्रसिद्धी माध्यमांशी सलोखा अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारे राजेश दत्तात्रय पाटील हे अप्पासाहेबांसह सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व.
वास्तविक आमदार किशोर अप्पा यांचे प्रचंड काम, त्यांचा अफाट जनसंपर्क यात शिवसेना पक्ष, जिल्हा बँक, जिल्हा दुधसंघ आदि जबाबदाऱ्या सांभाळत सर्व कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत सलोखा ठेवत कोणाचेही मन दुखणार नाही आणि सर्वांचे काम होईल ही जबाबदारी सांभाळणे अशी कामे ते संयमाने पार पाडतात.
आ. किशोर पाटील हे सात वर्षापूर्वी आमदार झाले. त्यापूर्वी ते शिवसेनेत होते. तेव्हापासून म्हणजेच आमदार पदाच्या आधी अगदी तुटपुंज्या मानधनावर कोन्तिती पदाची लालसा न घेता आपले काम केले. म्हणून आ. पाटील यांनी त्यांची जबाबदारी वाढवली.
पाचोरा, भडगावच्या गावागावातील, गल्लीबोळातील तसेच पाचोरा, भडगाव शहरांच्या प्रत्येक नागरिकांना त्यांनी आपलेसे करुन घेतले असल्यामुळे समस्याग्रस्त व्यक्ती, पदाधिकारी थेट राजेश पाटील यांना भेटून समस्या सांगत असतात. या समस्येवर ते पूर्णपणे ‘आपण काय केले पाहिजे, काय करुन घेतले पाहिजे, गावातील समस्या सोडवतांना त्या कशा पध्दतीने सोडवता येतील, तसेच पाचोरा, भडगावसह मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात कोणकोणत्या योजना राबवल्या पाहिजे, कोणकोणती कामे केली पाहिजे’ याबाबत आमदार किशोर पाटील यांना सविस्तर माहिती देऊन आपली जबाबदारी सांभाळत असतात.
त्यांनी मतदारसंघातील रस्ते, स्मशानभूमी, सांडपाण्याच्या गटारी, सार्वजनिक शौचालय, व्यायाम शाळा, वाचनालये, क्रिडा साहित्य, बस स्टॅन्ड, पाचोरा शहरातील भुयारी गटारी शॉपिंग सेंटर, विद्यार्थ्यांकरिता लायब्रर, हुतात्मा स्मारक पाण्याचा प्रश्न, कृष्णापुरी पुल, कोंडवाडा गल्ली पुल, स्मशानभूमी जवळील पूल आदी प्रश्न त्यांनी आमदारांच्या माध्यमातून मार्गी लावले. तसेच आ. पाटील यांच्या माध्यमातून वेळप्रसंगी मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात शहराचा व तालुक्याचा कायापालट केला आहे.
स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी आपले कामकाज सांभाळताना परके समर्थक व विरोधक असा कोणताही भेदभाव केला नाही. सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी त्यांना सहकार्य केले. त्यांच्या या कार्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे.