जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्ह्याचे शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय नवीपेठतील खान्देश सेंट्रल स्टेशन रोड या परिसरात उभारल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे, माजी मंत्री सुरेश जैन यांच्या कुटुंबातून जरी कोणीही सक्रिय राजकारणात नसले तरी पूर्वाश्रमीचे कट्टर समर्थक असलेले नितीन लढ्ढा यांना राजकीय वारसदार म्हणून बघितले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला अवधी बाकी असताना आता पासून सामान्य नागरिकांपर्यत पोहचण्यासाठी त्याच्या समस्या सहज सोडविता याव्यात म्हणून संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे, दादा समर्थक असलेले मणियार बंधू यांच्या कडे लढ्ढा यांच्या संपर्क कार्यालयाची धुरा सणार आहे.
जिल्ह्यात गेल्याकाळात राजकीय क्षेत्रात मातब्बर समजले जाणारे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचा मोठा दबदबा होता शहरात आणि इतरत्र जिल्ह्यात त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता मात्र घरकुल घोटाळ्याच्या झालेल्या आरोपामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला यामुळे राजकीय प्रवाहातून सुरेश दादा बाजूला सारले गेले मात्र त्यांचे खंदे समर्थक नितीन लढ्ढा यांनी ” ७ ‘ शिवाजी नगर सह महापालिकेवर नियंत्रण मिळवले याआधी माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या कडे संपूर्ण धुरा होती मात्र त्यांना देखील घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे नगरसेवक लढ्ढा यांचे कडे संपूर्ण जबाबदारी आली
येणाऱ्या विधानसभेमध्ये नगरसेवक नितीन लढ्ढा हे शिवसेनेचे उमेदवार असतील यासाठी त्यांनी जाहीर वाच्यता केली नाही मात्र त्यांचे समर्थक विधानसभेच्या दृष्टीने कामाला लागले आहे, यामुळे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापणार हे निश्चित आहे.