(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शेतकरी बांधव कीटकनाशकांचा वापर करीत असताना त्याचे होणारे दुष्परिणाम व त्यावर करावयाचे आवश्यक उपचार याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सजग रहावे. जेणेकरून कीटकनाशकापासून विषबाधेसारख्या दुर्घटना टळू शकतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी डॉक्टरांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
कृषी आयुक्तालय, कृषी विभाग, पुणे, क्रॉप लाइफ इंडिया व शिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिलीच कीटकनाशकापासूनचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता, उपचार व व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन झाली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. ठाकुर, कृषी उपसंचालक अधिकारी अनिल भोकरे, मेडिकल कौन्सिल अध्यक्ष डॉ. चौधरी, क्रॉप लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तित्व सेन, बायरचे सुशिल देसाई, शिवार फाऊंडेशनचे विनायक हेगाणा आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सेन यांनी प्रस्तावना तर शिवार फौंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी आभार मानले.